बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 02 हजार 740 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 03 हजार 233 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 27 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 63 लाख 09 हजार 021 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.05 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

अमेरिकेचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानला करणार ‘इतक्या’ मिलीयन डाॅलर्सची मदत

शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

अनिल देशमुख फरार ???; भाजपच्या आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

कर्णधार कोहलीच! कर्णधारपदाच्या संभाव्य चर्चेवर बीसीसीआयचं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More