मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाई नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे, असा मजकूर त्यामध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा हा संकेत नेमका कोणासाठी आहे यावर चर्चा रंगली आहे.
परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर सध्या फोन टॅपिंग प्रकरणावर संजय राऊत दिल्लीत राहून सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला होता. तर आज वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा अर्थाचा संदेश राऊतांनी ट्विट केला आहे. तेव्हा हे ट्विट कोणाला उद्देशून आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ असं कॅप्शनही दिलं आहे.
सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणानंतर राज्य सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असंही वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं, असही संजय राऊत म्हणाले होते.
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
थोडक्यात बातम्या –
राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत
गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत
“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.