Top News खेळ

उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय संघ 244 धावांमध्ये गारद झाला. दरम्यान ऑस्ट्रेलिया फलंदाजांची सुरुवात फार खराब झाली.

दरम्यान या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने एक उत्तम असा झेल टिपला आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर कोहलीने कॅमरुन ग्रीनचा झेल घेत सर्वांची मनं जिंकली.

कॅमरुन ग्रीनने ऑन साइडला फटका मारला. पॉईंटवर उभा असलेल्या कर्णधार विराट कोहलीनं हवेत झेपवत भन्नाट झेल घेतला.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी फार खराब कामगिरी केली. मात्र विराट कोहलीने टिपलेल्या झेलमुळे त्याने इतर खेळांडूंसमोर एक चांगला आदर्श ठेवलाय.

थोडक्यात बातम्या-

उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण

‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या