बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा – अमृता फडणवीस

पुणे | पुण्यात कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे, पण पाॅझिटीव्हीटी दर कमी झालेला नाही. त्यामुळे पुण्यात लावण्यात आलेल्या निर्बंधात राज्य सरकारने सुट दिलेली नाही. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पुण्याच्या निर्बंधाविषयी सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.

पुण्यात आयोजित केलेल्या एका हातमागावरील वस्तूंच्या महोत्सवाचं उद्धाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 4 टक्के पाॅझिटीव्हीटी दर असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यात पाॅझिटिव्हीटी दर जास्त असल्यानं लसीकरण प्रक्रियेवर भर दिला जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या जिल्ह्यात जास्तीचे लसीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आल्याचं टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात पैठणीचा कारोबार मोठा आहे. शेतीनंतर भारतात हातमाग हा मोठा व्यवसाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखलं. देशातील स्त्रिया पैठणी ऐटीत घालतात. या क्षेत्रात 77 टक्के कामगार या स्त्रिया आहेत, असं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अडचणीच्या काळात सचिन तेंडूलकरनं मला मदत केली – विराट कोहली

प्रशांत किशोर यांनी दिला मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा!

7 मुलांच्या 67 वर्षीय बापाने केला 19 वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह, केली ‘ही’ मागणी

‘झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका’; आरोग्यमंत्री राजेश टोपेेंचं जनतेला आवाहन“ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून संपले, हा या देशाचा इतिहास”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More