बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा

नवी दिल्ली | आज ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवली होती. ट्विटरनं उपराष्ट्रपतींचं अकाउंट अनव्हेरिफाइड केलं होतं. मात्र आता ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं आहे. ट्विटरच्या या कृतीवर केंद्र सरकारनं चांगलाच रोष व्यक्त केला आहे.

सरकारनं नव्या आयटी नियमांबद्दल ट्विटरला शेवटचा इशारा दिला आहे. लवकरच भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक करा, असं सरकारनं ट्विटरला बजावलं आहे. जर कंपनी भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक करत नसेल तर परिणामासाठी तयार राहा, असा इशारा सरकारनं ट्विटरला दिला आहे.

सरकारनं ट्विटरला सांगितलं की, नियमांचं तात्काळ पालन करण्यासाठी सरकार ट्विटरला अंतिम नोटीस देत आहे. नियमांचं पालन न केल्यास आयटी कायदा 2000 च्या 79 कलमांतर्गत सूट रद्द होईल आणि ट्विटर आयटी कायदा आणि इतर कायद्यांनुसार दंड देण्यास पात्र ठरतील. यापूर्वीही सरकारनं कंपनीला भारतीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र अजूनही ट्विटर कंपनीनं माहितीसाठी भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक केली नाही.

दरम्यान, उपराष्ट्रपती यांच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सुरेश सोनी आणि अरुण कुमार यांच्यासह इतरही वरिष्ठांच्या नावसमोरील ब्लू टीकही ट्विटरनं हटवली आहे. त्यांची ब्लू टिक अजूनही रिस्टोर झालेली नाही. ट्विटरवरील ब्लू टिक ही एखाद्या मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचं अधिकृत अकाउंट असल्याचं दर्शवत असतं. यात सरकारी कंपन्या, मोठे ब्रॅन्ड, मोठ्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि इतर बड्या व्यक्तींचा समावेश यात असतो.

थोडक्यात बातम्या –

काहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ

पाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More