मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2020 आणि नविन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन राज्याच्या गृह विभागाने नागरिकांना केलं आहे. त्यासाठी काही सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचना-
- नववर्षाच्या स्वागता निमित्ताने घराबाहेर न पडता, नविन वर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
- नागरिकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी समुद्र किनारे, बागा, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
- करोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील आणि 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- नववर्षाच्या स्वागता निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये, मिरवणूकाही काढू नयेत.
- नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्याठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये.
थोडक्यात बातम्या-
खळबळजनक! विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या, रेल्वे रुळावर सापडला मृतदेह
“स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे”
“पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार”
चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट; सत्य बाहेर येताच पोलीसही चक्रावले!
“पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार”