बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते ‘या’ कारणासाठी आले एकत्र!

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे काही दिवसांपूर्वी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. आज दोन्ही नेत्यांचे युवा कार्यकर्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी एकत्र आले होते.

जावलीत उदयनराजे यांचं काही चालत नाही तर फक्त शिवेंद्रराजे यांचं चालतं, असं वक्तव्य जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केलं होतं. 

वसंतराव मानकुमरे वादग्रस्त वक्तव्य करून दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. वसंतराव मानकुमरे यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन युवा कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी सचिन बोरकर यांना दिलं आहे. 

दरम्यान, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन व्हावं, अशी इच्छा देखील युवा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नगर पॅटर्न आवडे ‘राष्ट्रवादी’ला?; ‘त्या’ नगरसेवकांवर अद्याप कारवाई नाही!

-परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडी; सारथ्य धनंजय मुंडेंच्या हाती! 

-कॉफी महागात पडली; हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचं निलंबन

-“आज…देवेंद्र फडणवीसांच्या घाशिराम कोतवालाचा नवा प्रयोग पहायला मिळाला” 

-अमित ठाकरेंच्या लग्नाचं राहुल गांधींना निमंत्रण; नरेंद्र मोदींना मात्र नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More