बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे?; अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ‘या’ व्यक्तीलाही इडीकडून समन्स!

मुंबई | माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. त्यांना मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय.

ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसा संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये आल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचमुळे त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे, अशी माहिती इडीने दिलीये.

मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना पाठवण्यात आलेलं हे पहिलं समन्स आहे. दोघांना वेगवेगळ्या तारखांचं समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना 6 जुलै, तर अनिल देशमुख यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स आहे.

दरम्यान,ईडीने शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. अनिल देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानंतर आता ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

थोडक्यात बातम्या- 

लसीकरण प्रमाणपत्रानंतर गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही मोदींचा फोटो!

‘कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट…’; WHO च्या प्रमुखांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

“मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो, माझी जबाबदारी आहे”

“राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे”

“भाजपच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More