बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार

नवी दिल्ली | जपान देशाचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. जपानच्या नारा शहरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

शिंजो अबे एका ठिकाणी भाषण देत होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाल्याचं समोर येत आहे. या घटनेनंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जपानच्या प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे हे पश्चिम जापनच्या नारा शहरात भाषणादरम्यान कोसळले. ते नारा येथे भाषण देत होते. प्राथमिक अंदाजानुसार ते जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. जापनची वृत्त संस्था एनएचकेच्या एका पत्रकाराला गोळी चालल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांना अबे यांच्या शरीरातून रक्त येताना दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले.

शिंजो अबे हे 2006 ते 2007 आणि 2012 ते 2020 या कालखंडात जपानचे पंतप्रधान होते. ते आतापर्यंत जपानचे दिर्घकालीन पंतप्रधान आहेत. अबे यांच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यांच्यावर रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत. त्यांना कार्डीआक अरेस्टचा झटका आल्याची देखील माहिती आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

शहाजीबापू पाटलांवर मोठं संकट, थोडक्यात बचावले; वाचा सविस्तर

काय ते झाडी, काय ते डोंगर; पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्यातील ‘या’ जागा एकदम ओक्के

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More