बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

मुंबई । काही दिवसांपूर्वी बाजारात खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीत वाढ झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली होती. पण आता सामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीये.

खाद्यतेल उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांना सूचित केल्या जाणाऱ्या स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाची एमआरपी (MRP) तातडीने कमी करण्याचा आदेश केंद्र सरकारनं दिलं.

खाद्यतेलाच्या किंमती 10-12 रुपये प्रतिकिलोने कमी करण्यात आले. ते मध्ये पामतेल (Palm Oil) , सूर्यफुलाच्या(Sunflower) आणि सोयाबीन (Soyabeen) तेलाच्या किंमती कमी करण्यास केंद्र सरकारने कंपन्यांना सांगितलं. येत्या आठवड्यामध्ये या तेलाच्या किंमती कमी झाल्याच पाहिजे असा आदेश देखील केंद्र सरकारने दिला. भारतामध्ये 60% खाद्यतेलाची मागणी ही आयातमधूनच होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीमध्ये बदल होऊन त्याचा परिणाम भारतातील तेलावर होतो.

येत्यात आठवड्यामध्ये सर्व महत्वाच्या कंपनीने तेलाच्या किंमती कमी करण्याचे तसेच केंद्र सरकाराच्या आदेशाचे पालन करण्याचं मान्य केलं आहे. केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे (Sudhanshu Pande) यांनी एक महत्वाची बैठक घेत ग्राहकांना दिलासा देणारी बातमी दिली. गेल्या एका महिन्यात शेंगदाणा म्हणजेच भुईमूग (Groundnut ) आणि वनस्पती तेल (Vegetable Oil) वगळता अन्य सर्व तेलांच्या किंमतीत झपाट्याने घट झाली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमती कमी झाल्यानंतर पूर्वीच्याच किंमतींना तेल विकलं जाऊ शकत नाही, असं सुधांशु पांडे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं?’; राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

काळीज पिळवटून टाकणारी घटना; 6 वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या डोळ्यादेखत जीव सोडला

शिवसेनेला आणखी एक झटका; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More