Food Safety l फ्रिजमुळे अन्न दीर्घकाळ ताजे राहते, मात्र काही पदार्थ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवले तर त्यांचे पौष्टिक घटक नष्ट होतात आणि ते विषारी ठरू शकतात. हे पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि आतड्यांमध्ये घातक जंतू वाढू शकतात.
‘हे’ पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊ नका :
भात लवकर खराब होतो, विशेषतः २४ तासांहून अधिक वेळ फ्रिजमध्ये ठेवला तर त्यामध्ये बॅसिलस सेरेयस (Bacillus Cereus) नावाचे जिवाणू वाढतात, जे विषारी घटक निर्माण करतात आणि पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे शिजवलेला भात लगेच खाणे किंवा २४ तासांच्या आत संपवणे योग्य आहे.
चिरलेल्या फळांमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे त्यांचे पोषणमूल्य कमी होते आणि त्यांच्यात बॅक्टेरिया वाढतात. विशेषतः सफरचंद, केळी, पपई आणि खरबूज २४ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवलेली सोललेली लसूण हिरवट मोड आणते, ज्यामुळे ती विषारी ठरते आणि श्वसनास त्रास होऊ शकतो.
Food Safety l पदार्थ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवले तर त्यांची गुणवत्ता बिघडते :
दूध, दही, पनीर आणि लोणी जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवले तर त्यांची गुणवत्ता बिघडते. २४ तासांनंतर दूध आंबट होण्याची शक्यता वाढते आणि पनीर-दहीसारख्या पदार्थांमध्ये जिवाणूंची वाढ होते.
तसेच शिजवलेले अन्न अनेक दिवस फ्रिजमध्ये ठेवणे घातक ठरू शकते. बॅक्टेरियामुळे अन्नविषबाधा होऊ शकते आणि गरम केल्यावरही त्यातील काही विषारी घटक नष्ट होत नाहीत. त्यामुळे उरलेले अन्न २४ तासांच्या आत संपवावे.
याशिवाय अर्धशिजवलेल्या अंड्यांमध्ये साल्मोनेला (Salmonella) नावाचा जिवाणू असतो, जो जास्त काळ ठेवला तर वाढतो आणि अन्नविषबाधा होण्याचा धोका असतो. उ
चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये संसर्ग होऊन लिव्हर आणि किडनीस नुकसान पोहोचू शकते.
अर्धवट वापरलेले आलं फ्रिजमध्ये ठेवणे घातक ठरू शकते. त्यावर तयार होणारे सूक्ष्म घटक श्वसन आणि लिव्हरसाठी अपायकारक ठरतात.