Foods for Immunity | पावसाळा म्हटलं की बऱ्याच जणांना भिजण्याचा मोह आवरत नाही. मात्र, पावसाळ्यामध्ये सतत भिजल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या काळात सर्दी, खोकला, ताप असे आजार लगेच होतात. त्यातच लहान मुलांना तर लगेच इन्फेक्शन होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.
पावसाळ्यात इम्युनिटी वाढवण्यावर अधिक भर द्यायला हवा. या लेखात इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, याबाबत माहिती सांगितली आहे. कारण, इम्युनिटी वाढवण्यात आहार महत्वाची भूमिका बजावते. आपला आहार चांगला असेल तर, अनेक व्हायरल आजारांपासून लढण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते.
इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा
लसूण : लसूण मध्ये अँटिबॅक्टेरियल आणि एंटीइंफ्लामेटरी गुण असतात, जे शरीराला रोगापासून लढण्यास मदत करतात.यासोबतच लसू मुळे इम्युन सिस्टीम देखील सुधारते. त्यामुळे आहारामध्ये लसूणचा समावेश असायलाच हवा.
फॅटी फिश : साल्मन, टूना, मैकरेल यासारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते आणि इम्युनिटीसाठी ते खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही फॅटी फिशचा आहारात समावेश करू शकता.
ब्रोकली : यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. ब्रोकलीमध्ये विटामिन ए आणि ई देखील भरपूर प्रमाणात (Foods for Immunity ) असते. त्यामुळे पावसाळ्यात ब्रोकली देखील खायला हवी.
दही : दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आपल्या गट हेल्थ साठी खूप लाभदायक असतात.दही मुळे इम्युनिटी सिस्टीम सुधारण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डायट मध्ये दहीचा समावेश करू शकता.
पालक : यामध्ये विटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. पालक खाल्ल्याने तुमची इम्युनिटी तर सुधारतेच शिवाय याच्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासही मदत करते. पावसाळ्यात तुम्ही पालकपासून बनवलेले चटपटीत पदार्थ देखील खाऊ शकता.
बदाम : बदाम मध्ये विटामिन ई आणि (Foods for Immunity ) ओमेगा-3असते. बदाम मुळे तुमचा मेंदू तेज होतो शिवाय रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. त्यामुळे दररोज बदाम खायला हवे. बदाम खाण्यापुर्वी ते पाण्यात भिजवले तर, त्याचा अधिक फायदा होतो. यासोबतच ते आपल्या केसांमध्ये आर्द्रता आणि चमक टिकवून ठेवते आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्येही फायदेशीर ठरते.
News Title – Foods for Immunity
महत्वाच्या बातम्या-
मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबत अनिल कपूर यांचा मोठा खुलासा!
राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी
“जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ, त्यांनी नेहमीच ओबीसीविरोधी भूमिका घेतली”
शिवभक्तांनो उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी; जाणून घ्या अधिक
केसातील कोंड्यापासून सुटका हवीये? तर ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी केसांना लावा