भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

मुंबई | भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते. 

मतविभाजन होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आमच्या सोबत यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मनसेनं आमच्यासोबत यावं हे माझं वैयक्तिक मत आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे गैरसमज आम्ही दूर करु, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील 44 लोकसभा मतदारसंघाबाबत आमच्या आघाडीत चर्चा झाली आहे, असं अजित पवार यानी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”