महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

मुंबई | शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून आता कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखांपर्यत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारने मागील वर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती, मात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता शेतकरी कुटुंबांला दीड लाखाची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. यामुळे एका शेतकरी कुटुंबांत अनेक सदस्य कर्जमाफीसाठी पात्र असतानाही सर्वांना मिळून दीड लाख रूपयाच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात आली होती.

दरम्यान, सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे कर्जमाफीस पात्र असलेल्या लाभार्थीच्या याद्या नव्याने करण्यात येणार असून शेतकरी कुटुंबांतील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक सदस्यांचा यादीत समावेश होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जन-धन योजनेच्या खातेदारांना 15 ऑगस्टला मिळू शकते मोदींकडून भेट

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या