महाशिवआघाडीचं ठरलं; उद्धव ठाकरेंकडं पाच वर्षे मुख्यमंत्रिपद??

मुंबई | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेसंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही, असं वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं होतं. मात्र, या बैठकीत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
महाशिवआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून पुढील महिन्यात याबाबतचा दावा केला जाऊ शकते. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद सोपवलं जाणार असल्याचं कळतंय. यासंबंधीचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
मुख्यमंत्रिपद वाटून घेतलं जाणार नसून ते उद्धव ठाकरेंकडे सोपवलं जाईल. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्यावर एकमत झाल्याचं कळतंय. शिवसेनेकडं 15, राष्ट्रवादीकडं 14 आणि काँग्रेसकडं 13 मत्रिपदं देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे द्यायचं याचा निर्णय शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं सोपवल्याचंही कळतंय. त्यामुळे महाशिवआघाडी सत्तास्थापनेच्या दिशेने पुढे जात असल्याचं बघायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेस-राष्ट्रवादीची दिल्लीतील आजची बैठक रद्द!- https://t.co/byeXpRFtUy #म
— थोडक्यात (@thodkyaat) November 19, 2019
कोल्हापूरात शिवसेना-काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर https://t.co/IF9ZRp1ly4 @NCPspeaks @ShivSena @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) November 19, 2019
मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी लांबणीवर https://t.co/U9E78S46Gy #म
— थोडक्यात (@thodkyaat) November 19, 2019