Top News देश

“ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं”

नवी दिल्ली | कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. यावरुन भाजपचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळं त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं, असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात अनिल विज यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट देखील केलं आहे. त्यात ते म्हणाले की, “मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असलं पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणं आपल्याला शोभा देत नाही,”

दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यावेळी ममता बॅनर्जींनी कार्यक्रमावेळी असलेली ही गर्दी एका खास पार्टीची असल्याचा आरोपही भाजपवर केला आहे.


थोडक्यात बातम्या-

TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार!

आगे आगे देखो होता है क्या- प्रसाद लाड

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना- राहुल गांधी

भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला- सुशीलकुमार शिंदे

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या