बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यासाठी तुम्ही मला खिशात टाकाच’; मलिकाचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल समीर वानखेडेंवर भाष्य करताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ‘नवाब मलिकांना खिशात ठेवतो’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून आता नवाब मलिकांनी थेट चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.

काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिकांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. किरीट सोमय्या दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. मीच त्यांची अधिवेशनादरम्यान पोलखोल करणार आहे, असा इशारा मलिकांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, मी अधिवेशनात पोलखोल केल्यावर भाजप नेते तोंड लपवून पळतील, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत. त्यामुळे आता भाजप नेते यावर काय उत्तर देतात याकडे सर्वाचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानची थेट अमेरिकेला धमकी

“मी अधिवेशनात पोलखोल करणार, भाजपचे नेते तोंड लपवून पळतील”

राज्यात हुडहुडी वाढली! स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर काढा

व्हायोलिनचा ‘स्वराधीन’ हरपला! ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

“छत्रपतींचा जयजयकार करायला लाज वाटते तो भंगारवाला आमच्यासाठी भंगारच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More