बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या घटली

कोल्हापूर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजला असतानाच कोल्हापूरमधील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत होती. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अनलॉकला सुरुवात झाली असताना कोल्हापूरमधील निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात येणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. परंतु, मागच्या 15 दिवसात पहिल्यांदाच कोल्हापूरमधील नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1184 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 1568 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कमी झालेले रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 37 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी 3 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 87.85% एवढा झाला आहे. तसेच आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 12,130 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या –

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

‘या’ कारणामुळे बंगालमध्ये आदिवासी महिलेला नग्न करून संपूर्ण गावात फिरवलं; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘या’ अभिनेत्याकडे सध्या घर खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत!

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More