‘बाप माणसा’ला ३ महिन्यांची पितृत्व रजा, ‘सेल्सफोर्स’चा निर्णय

Photo- Pixabay

मुंबई | सेल्सफोर्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपनीने प्रथमच पालक बनणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क ३ महिन्यांची पितृत्व रजा देण्याचा निर्णय घेतलाय. ही आतापर्यंतची सर्वात मोठी पितृत्व रजा ठरलीय.

बहुतांश कंपन्यांमध्ये पितृत्व रजेचा कालावाधी १० दिवसांचा असतो. मायक्रोसॉफ्टने अलिकडेच ६ आठवड्यांची पितृत्व रजा घोषित केली होती.

दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर पित्यानं त्याच्याजवळ असणं गरजेचं असतं, तसेच पैशांचीही गरज असते त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सेल्सफोर्सचे संचालक ज्ञानेशकुमार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या