बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

लखनऊ | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात एका महिला गुन्हेगाराला फासावर लटकवण्यात येणार आहे. या महिला गुन्हेगारचं नाव शबनम असून ती उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी आहे. तिने १५ एप्रिल २००८ रोजी अमरोहातील बावणखेडी येथे अत्यंत निर्दयीपणे आपल्या परिवारातील सात जणांची हत्या केली होती. कुटुंबातील सगळेच प्रेमाच्या आड येत होते म्हणून शबनमने प्रियकर सलीमच्या मदतीने हा हत्येचा कट रचला होता.

घटनेनंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. शबनमला बरेलीच्या तुरूंगात तर सलीमला आगऱ्याच्या तुरूंगात ठेवलेलं आहे. त्यानंतर अमरोहा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने शबमनच्या मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर फासावर चढणारी शबनम पहिला महिला असणार आहे.

१५० वर्षापुर्वीच्या मथूरा जेलमध्ये तिला फाशीवर चढवण्यात येणार आहे. ब्रिटीश काळात १८७० मध्ये बांधलेलं हे भारतातील एकमेव महिला फाशीघर आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणत्याही महिलेला येथे फाशी देण्यात आली नाही. वरिष्ठ जेल अधिक्षक शैलंद्र कुमार मैत्रेय यांनी सांगितले अद्याप फाशीची तारीख निश्चित नाही, मात्र डेथ वॉरंट जारी केल्याबरोबर शबनमला फाशी देण्यात येईल.

बिहारच्या बक्सरमधून फाशीसाठीची रस्सी मागवण्यात आली आहे. जेल अधिक्षकांच्या मते पवन जल्लाद यांनी फाशीघराची दोनदा पाहणी केली. त्यात काही बाबींमध्ये त्रुटी आढळल्याने त्या दुरुस्त केल्या जात आहेत, जर शेवटच्या क्षणी काही अडचण आली नाही तर शबनम स्वातंत्र्यानंतर फासावर चढणारी पहिला ठरेल.

थोडक्यात बातम्या

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार

शिक्षणसंस्था अशी पाहिजे की सुरवंटाचेही फुलपाखरू झाले पाहिजे; गिरीश प्रभुणे

पूजा सावंतने समुद्र किनारी केलं ग्लॅमरस फोटोशूट!

“संजय राठोड वनमंत्री आहेत, ते दाट वनात संशोधन करत असतील”

‘या’ देशात फेसबुकने बातम्या वाचण्यावर घातली बंदी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More