बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नानंतर विकी-कतरिना पहिल्यांदाच मिडियासमोर, विककॅटच्या लूकनं वेधलं लक्ष

मुंबई | सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा रंगलेली दिसत आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाची (Katrina Kaif). 9 डिसेंबरला पार पडलेला त्यांचा शाही विवाहसोहळा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच लग्नानंतर विकी-कॅटचा पहिला लूक समोर आला आहे.

लग्नगाठ बांधल्यानंतर विकी आणि कतरिना पहिल्यांदाच मिडियासमोर आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही एकच चर्चा पहायला मिळत आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर कतरीना खूप सुंदर रुपात पहायला मिळाली. कपाळवरती कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा भरलेला, फिक्या गुलाबी रंगाचा चुडीदार या मनमोहक लूकनं सगळ्याच्या नजरा खिळल्या असल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, लग्नानंतर ही जोडी मुंबई विमानतळावरूनच थेट हनीमूनला रवाना झाली होती. त्यानंतर आज ते मुंबईत परतले आहेत. दोघांना असं एकत्र पाहून विककॅटचे चाहते भलतेच खूश असल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या प्रत्येक फोटोवर भरभरुन प्रतिसाद पहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

थोडक्यात बातम्या – 

अखेर अभिनेत्री अंकिता लोखंडे अडकली लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

रूपाली ठोंबरेंचा मनसेला दे धक्का; लवकरच ‘या’ नव्या पक्षात करणार प्रवेश

राज्यात Omicron चा धोका वाढला; ‘या’ ठिकाणी सापडले आणखी 8 रुग्ण

मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली, म्हणाले…

मृत स्वप्नील लोणकर मुलाखतीसाठी पात्र! वडिलांचा MPSC वर आरोप, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More