बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच महिला खासदारांना संसदेत बोलण्याची संधी

नवी दिल्ली | महिला दिनानिमित्त आज संसदेत पहिल्यांदाच महिला खासदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी महिलांना 50 टक्के आरक्षणाची मागणी केली. यावेळी भाजप खासदार सरोज पांडे म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात महिला सशक्तीकरण झालं. स्त्रीभ्रूणहत्या आणि ट्रिपल तलाकसारखे गंभीर आणि महत्वाचे मुद्दे मांडल्या गेले. मोदींनी ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ योजना सुरू केली त्यामुळे महिलांचा दर्जा वाढला. यादरम्यान त्या म्हणाल्या, महिलांच्या मुद्दयांवरून राजकारण व्हायला नको.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या की, ’24 वर्षापूर्वी आम्ही संसदेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. आज 24 वर्षानंतर संसद आणि विधानसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे’.

राष्ट्रवादीच्या खासदार डाॅ. फौजिया खान यांनी म्हटंल की, अनेक अहवालात असं दिसून आलं आहे की 6 टक्यांपेक्षा जास्त  महिला नेतृत्व करत आहेत. याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आपण लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन एक सुरुवात करू शकतो.

दरम्यान, महिला दिन साजरा करण्याची परंपरा सन 1908 मध्ये महिला कामगार चळवळीमुळे सुरू झाली. या दिवशी न्यूयाॅर्क शहरातील 15,000 महिलांनी नोकरीचे तास कमी करण्यासाठी , चांगल्या पगाराची मागणी आणि इतर काही अधिकाराच्या मागण्यांसाठी आंदोलने केली होती. त्यानंतर एका वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टिने हा दिवस पहिला राष्ट्रीय दिन म्हणून घोषित करण्यात आला. 1910  मध्ये कोपेनहेगन येथे महिला कामगारांची एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. तेव्हा हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं.

थोडक्यात बातम्या

नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला- अजित पवार

मुंबईकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार?; पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

कोरोना लसीकरण केंद्रावर आजीबाईंनी साजरा केला 100 वा वाढदिवस, पाहा व्हिडिओ

राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More