औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी अंगावर चाबकाचे फटके मारत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. औरंगाबादमधील क्रांती चौकात आंदोलकांनी हे आक्रमक पाऊल उचलंल.
आरक्षणासाठी क्रांती चौकात मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी अंगावर चाबकाचे फटके झेलत फडणवीस सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आश्वासन दिलं होतं. मात्र तरिही मराठा समाजाकडून मोर्चे आणि बंदची हाक देण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!
-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप
-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच
-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!
-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती