बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे बंगालमध्ये आदिवासी महिलेला नग्न करून संपूर्ण गावात फिरवलं; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

कोलकाता | पश्चिम बंगालमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यातील कुमारग्राममध्ये एका आदिवासी महिलेला संपूर्ण गावात नग्न फिरवण्याचा प्रकार घडला असून त्याची मोबाईलमध्ये चित्रफीतही बनवण्यात आली आहे. या महिलेला दिलेल्या अजब शिक्षेमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेने सहा महिन्यांपूर्वी विवाहबाह्य संबंध असल्यामुळे आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, असं स्थानिक नागरिक सांगतात. तसेच मागच्या आठवड्यात आपल्या घरी परतली आणि गावातील लोकांनी तिला घराबाहेर काढलं आणि शिवीगाळ करत संपूर्ण कपडे काढून गावात नग्न फिरवलं.

दरम्यान, ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 9 जून रोजी 11 लोकांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर संबंधित आदिवासी महिलेने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती.

पण या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि महिलेचा पती पोलिसांना घेऊन आपल्या सासरी गेला आणि तिला घेऊन घरी परतला आणि त्यानंतर महिलेने पतीच्या उपस्थितीत आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करून गावातील 11 आरोपींना अटक केली असून 5 आरोपी फरार आहेत. या सर्व प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘या’ अभिनेत्याकडे सध्या घर खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत!

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला डेल्टा व्हेरीएंट आता डेल्टा प्लसमध्ये बदलला, भारताला धोका किती?

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More