बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही जीवावर उदार होऊन शूटिंगला जातो; ‘अग्गंबाई सासूबाई’तील कलाकार भडकला!

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट तसेच मालिकांचे शुटींग करण्यावर सरकाराने बंदी घातली होती. या काळात टीव्हीवर जून्या मालिका दाखवण्यात आल्या. त्यात अग्गंबाई सासुबाई या मालिकेचा देखील समावेश आहे. परत परत त्याच मालिका दाखवत असल्याने त्या मालिकांना लोकही कंटाळी होती. त्यामुळे या मालिकांवर अनेक लोकांनी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे अग्गंबाई सासुबाई या मालिकेतील एक मुख्य कलाकार लोकांच्या प्रतिक्रिया पाहून राग व्यक्त केला आहे.

एका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत अंग्गबाई आसावरी दृष्ठ काढ तुझ्या बाळाची देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करतोय. तर तुझी पण मी दृष्ठ काढतेय, अरे काय लिहतोय रे शी, नाही रे बघवत अशी कमेेेंट्स केल्या गेल्या होत्या. त्या कमेंट्ला आता मालिकेतील कलाकार गिरिश ओक उत्तर दिलं आहे.

अग्गंबाई सासुबाई  मालिकेत मुख्य भूमिका निभावणारे गिरीश ओक यांनी सुद्धा या कमेंट्समध्ये भाग घेतला आणि टीका करणाऱ्यांना सडोतोड उत्तर दिलं आहे. लॉकडाऊनचा काळ जाऊन अजूनही तशीच आतिषबाजी चालू आहे, हे बघून बरं वाटलं, असं गिरिश ओक त्या नेटकऱ्याला म्हणाला आहे. काही पोस्ट ओक यांनी प्रथम स्पोर्टिंगली घेण्याच्या नादात त्यावर तशीच मार्मिक टिप्पणी केली. परंतु नंतरच्या एका कमेंट्ला उत्तर देताना ओक यांना राग आलेला दिसून आलाय.

दरम्यान, तुमचा वेळ मजेत जातोय नं, मग झालं तर, पार्टीवर राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत. बुद्धीही खर्च न करता वेळ मजेत जातोय तुमचा. तुमच्या या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जीवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय, असं ओक यांनी एका कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राजू शेट्टी यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ प्रस्ताव

‘शरद पवारांवर आता फक्त पुस्तक यायचं बाकी आहे’; चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

“राणी बागेतील ‘पेंग्विन’ म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी”

‘भारताला महासत्ता बनायचं असेल तर…’; नितीन गडकरींनी दिला मोलाचा सल्ला

‘देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला तालिबान जबाबदार’; भाजप आमदाराचा अजब दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More