फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…

नवी दिल्ली | फोर्ब्ज इंडियाने 2018 सालातील सर्वात श्रीमंत 100 भारतीयांची यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. 

2017 पासून मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत, त्यांची संपत्ती 47.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे तर अझीम प्रेमजी श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत ते 21 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मालक आहेत.

तिसऱ्या स्थानावर लक्ष्मी मित्तल यांनी झेप घेतली आहे. त्यानी हिंदुजा ब्रदर्स या कंपनीला चौथ्या स्थानी टाकलं आहे. लक्ष्मी मित्तल यांची 18.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स संपत्ती आहे तर हिंदुजा ब्रदर्सची 18 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी संपत्ती आहे.

दरम्यान, कुमार बिर्ला, गोदरेज ग्रुप, गौतम अदाणी, शिव नायर पहिल्या 10 स्थानांवर आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

-राजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं भाकीत, पाहा काय म्हणाले…

-पालकमंत्री दाखवा अन् हजार रुपये मिळवा; बुलडाण्यातील अजब प्रकार

-आता मी बघतो किती लोक वाचतात; नरेंद्र मोदींचा गांधी परिवाराला इशारा

-‘लोग कहते है मैं शराबी हूं’ गाण्यावर भाजप आमदाराचा बेधुंद डान्स