Ford Equator l फोर्ड कंपनीने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने नवी एसयूव्ही जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे. कंपनी आपली नवीन कार जागतिक स्तरावर लाँच करण्याच्या तयारीत आहे. फोर्डने नवी Ford SUV Equator कार जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे. ही कार फोर्ड एव्हरेस्टपेक्षाही मजबूत असल्याचे दिसत आहे. या फोर्ड कारची खास गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन पर्यायासह येत आहे.
फोर्डच्या नवीन कारमध्ये काय खास आहे? :
कार निर्माता कंपनी फोर्डने अद्याप अधिकृतपणे आपल्या एसयूव्हीचा खुलासा केलेला नाही. पण या कारचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. या कारचा फोटो पाहूनच या कारचा लुक आणि डिझाईनचा अंदाज लावता येत आहे. या नवीन फोर्ड एसयूव्हीचा लूक खूपच प्रेक्षणीय आहे.
फोर्ड इक्वेटरमध्ये एक छोटी ग्रील बसवण्यात आली आहे. तसेच ते अधिक आकर्षक दिसण्यासाठी एलईडी लाईट्ससह डिझाइन केले आहे. याशिवाय कारच्या फ्रंट बंपरमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. ही नवीन SUV त्याच्या आधीच्या मॉडेलसारखी दिसते. पण डिझाइनमध्ये बदल करण्यासाठी कारमध्ये नवीन अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. या कारच्या इंटीरियरचा फोटो अद्याप समोर आलेला नाही.
Ford Equator l नवीन SUV ची पॉवरट्रेन कशी असेल? :
फोर्डच्या या नव्या एसयूव्हीमध्ये प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनचा पर्याय पाहायला मिळणार आहे. ही कार 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असू शकते, जी 150 एचपी पॉवर जनरेट करेल. या व्यतिरिक्त या कारच्या इंजिनला 82 hp पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटर देखील जोडलेली असू शकते. या कारच्या इंजिनमधून एकूण 218 hp आउटपुट देऊ शकतो.
फोर्ड इक्वेटरमध्ये 1.5-लिटर इकोबूस्ट पेट्रोल पॉवरप्लांट देखील असू शकतो, जो 170 एचपी पॉवर आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करेल. कंपनी 2.0-लिटर इकोबूस्ट इंजिन प्रकार बंद करू शकते. मात्र कंपनीने या कारची किंमत अद्याव जाहीर केलेली नाही.
News Title – Ford New SUV-Equator Photo
महत्त्वाच्या बातम्या
महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट
राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?
आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता
मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल
‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत