बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण दिशाभूल करणं रक्तात नाही- खासदार संभाजीराजे

रायगड | मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात लोक माझ्यावर नाराज झाले. पण मला समाजाला वेठीस धरायचं नाही. धरणार नाही.माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावार अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही, असं संभाजीराजे म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, असं संभाजीराजे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

हसतं खेळतं कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त; सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घरी येताच पतीचाही मृत्यू

‘…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरेल’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!RR

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More