पुणे महाराष्ट्र

“पूरग्रस्त विद्यार्थांचे परीक्षा शुल्क माफ करा”

पुणे |  अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दुर्बल घटकांचे मोठे नुकसान झाल्याने विद्यार्थांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांना केलं आहे.

राज्यात परतीच्या पावसानं  थैमान  घातल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. इतकंच नव्हे, तर शेतकरीही आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. विद्यार्थीही या संकटाला तोंड देत आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थांचे परीक्षा शुल्क माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

विद्यापीठातील वस्तीगृहाचे शुल्क माफ करण्यात यावेे. आणि महाविद्यालयातर्फे कुठल्याही प्रकारचं शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येणार नाही, त्यासाठी आवश्यक सूचना महाविद्यालयात देण्यात याव्यात, अशीही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यानतीन करण्यातं आली आहे.

सरकारदरबारी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्व विचार व्हावा आणि त्यावर अंमलबजवणी करण्यात यावी, असंही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या