बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचं कोरोनाने निधन

चंद्रपूर | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही बडे राजकीय नेते, अभिनेते यांनाही कोरोनाने आपला बळी केलं आहे. अशातच कोरोनाने चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचं निधन झालं आहे.

मागील काही दिवसांपुर्वी संजय देवतळे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय देवतळे यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोनाची चाचणी करून घेतली त्यावेळी त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील रूग्णालयात उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे.

दरम्यान, संजय देवतळे 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी 2019ची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. मात्र त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

थोडक्यात बातम्या- 

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

पुण्यात बनणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत परदेशात कमी पण भारतात सर्वाधिक!

सुजय विखेंनी त्या बॅाक्समधून नक्की काय आणलं?, रुपाली चाकणकरांना मोठी शंका

राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण, ‘या’ कारणामुळे कांड घडल्याची जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More