बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

अहमदनगर |  राज्यात अनेक ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज तोडण्यात येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तिथे शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात माजी आमदाराने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा येथे विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास शेतकऱ्यांसाठी विनंती केली. शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती कुठलेही पीक नाही. साखर कारखाने नुकतेच सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांकडे ऊसाचं पेमेंटही आलं नाही, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

बाळासाहेब मुरकुटे आणि भाजपच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांंकडून पाच हजार रूपये न घेता तीन हजार घ्यावेत अशी विनंती केली होती. त्यांची मागणी अधिकाऱ्यांनी मान्य न केल्याने बाळासाहेब मुरकुटे यांनी वीजवितरण कंपनीमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, राज्यातील वीजबिल थकबाकीचा प्रश्न अधिकचं गंभीर होत चालला आहे. शेतकरी थकबाकी न भरू शकल्यास वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांना जनावरांना पाणी भरणे देखील कठीण होत आहे. महावितरण कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडीत केल्यानेच भाजपकडून नेवासा येथे आंदोलन करण्यात आलं.

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंहाच्या घरापुढे पोहोचली टीम, दारावर चिकटवली ‘ही’ नोटीस

खुद्द शरद पवार साताऱ्यात दाखल! शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर बंद दाराआड खलबतं

‘प्रस्ताव आला तर भाजप विचार करेल’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

खुल्लम खुल्ला प्यार! प्रसिद्ध गायिकेचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लय जबरी पाऊस होणार!, महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More