बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 महिन्यांचा कारावास भोगलेले भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

यवतमाळ | भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हे 2019 मध्ये आमदार म्हणून वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजपाने त्यांच्या जागी डॉ. संदीप धुर्वे यांना तिकीट दिलं होतं. आता पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची भेट घेऊन त्यांनी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्याचं समजतंय.

येत्या काही दिवसात आर्णी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तोडसाम राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. तोडसाम यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची आदिवासी नेतृत्वाची पोकळी भरली जाणार आहे.

भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला होता. वीज वितरणविरोधात आंदोलन करताना लेखपालाला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले होते. पांढरकवडा सत्र न्यायालयानं राजू तोडसाम यांना ही शिक्षा सुनावली. त्यामुळे तोडसाम यांची कारागृहात रवानगी झाली होती.

दरम्यान, राजू तोडसाम यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. तीन महिने कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली कारावासाची शिक्षा वरिष्ठ न्यायालयानंही कायम ठेवली होती. त्यामुळे राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. या घटनेनं ते चांगलेच चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More