सिमला | सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांचा मृतदेह सिमला येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अश्विनी कुमार यांच्या मृत्यूबाबतचं वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू, सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अश्विनी कुमार लिहिलेली चिठ्ठी आढळली असून जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचं त्यात म्हटलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”
‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी
भाजपने आपल्या पुण्यातील ‘या’ नेत्याकडे सोपवली एक मोठी जबाबदारी!
राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा असतानाच एकनाथ खडसेंना शिवेसेनेकडून ऑफर