बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

मुंबई | गेल्या 3 दशकापासून देशाचं राजकारण हे राम मंदिर (Ram Mandir), अयोद्धा, बाबरी मस्जिद (Babri) यांभोवती फिरत होतं. सर्वोच्च न्यायालयाने (SC) या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत जागेवर अखेर राम मंदिराचा हक्क असल्याचं सांगितलं. त्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. तर काहींनी असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर हा निकाल देणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांची ऑटोबायोग्राफी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

सरन्यायाधीश असताना गोगोई यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांना निर्दोष देखील मुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी देखील मिळाली होती. त्यावेळी विरोधीपक्षांनी त्यांचा कडाडून विरोध केला होता. अशातच रंजन गोगोई यांनी बाबरी मस्जिद निकालानंतर केलेल्या सेलिब्रेशनवर लिखान केलं आहे.

संध्याकाळी मी सहकारी न्यायमूर्तींना डिनरसाठी ताज मानसिंह हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळी आम्ही चायनीज जेवण खाल्लं. त्या हॉटेलमध्ये असलेल्या सर्वात चांगल्या वाईनची एक बॉटल घेतली, असं रंजन गोगाई त्यांच्या जस्टिस फॉर द जज (Justice for the Judge) या ऑटोबायोग्राफी म्हणतात.

दरम्यान, रंजन गोगोई यांची जस्टिस फॉर द जज ही ऑटोबायोग्राफी सध्या चर्चा विषय बनली आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या लिखानामधून अनेक गोष्टी बाहेर येतील, अशी देखील शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

काँग्रेसचा सेल्फगोल! “पक्षाच्या नाहीतर अपक्ष उमेदवाराला मतदान करा”

Omicronचा धोका वाढतोय! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दो दिलों का मिलन! कैफ-विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More