बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय तर मग आता धनगर आरक्षणही द्या”

मुंबई | ओबीसी आरक्षणावर महत्वाची सुनावणी आज पार पडली. बांठिया आयोगाच्या (Banthia Commission) शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या असे आदेश सर्वाोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने माजी मुख्य सचीव जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगाची नियुक्ती केली होती.

पुढील 2 आठवड्यात राहिलेल्या निवडणुका प्रक्रिया जाहिर करा, असं सांगण्यात आलं आहे. या निर्णयावरुन भाजप शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचा शब्द पाळला, असं वक्तव्य केलं. या त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली.

ओबीसी (OBC) आरक्षणासंदर्भात श्रेयवादाची लढाई होत राहील. ओबीसी आरक्षण मिळालं तर ही आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस जर त्याचं श्रेय घेत असतील तर त्याचं पद्धतीने त्यांनी धनगर समाजालाही आरक्षण मिळवून द्यावं. तसंच बठिंया आयोग हा मविआ सरकारने स्थापन केला होता, असं त्यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल बोलताना चव्हाण, असं म्हणाले. यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्तारावर काही परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले. ही बाजू खूप गुतांगुतीची असल्याने न्यायालयाला विचार करून अभ्यास करुन निर्णय द्यावा लागेल, असंही वक्तव्य पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘…तर महिन्याला 5000 रूपये पेंशन मिळेल’; सरकारची भन्नाट योजना

‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

e-Aadhar संदर्भात ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More