बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सरकार पाडण्यासाठी भाजप नेते पोते भरून पैसे घेऊन हेलिकॉप्टरने आले’; माजी मुख्यमंत्र्यांचा शहांवर आरोप 

नवी दिल्ली | ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही अशा राज्यात भाजपने ऑपरेशन लोटस केले आणि राज्यातील सरकार पाडत आपली सत्ता स्थापन केली. अशाचप्रकारे पुद्दुचेरीची सत्ता गमावलेले माजी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘इंडिया टूडे’ च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

आम्ही सत्तेत आल्यानंतर वर्षातच अमित शहा यांनी अमित शहा यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच भाजप, अन्नामुद्रक आणि चेन्नईमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नारायणसामी यांनी केला आहे. तर कर्नाटकच्या भाजप नेेत्यांनी पोते भरून पैसे हेलिकॉप्टरने पुद्दुचेरीला आणले असल्याचंही नारायणसामींनी म्हटलं आहे.

आमच्या काही आमदारांना दिल्लीत बोलवण्यात आलं आणि त्यांना तिथे धमक्या देण्यात आल्या. दिल्लीतून दिलेल्या आदेशानुसार काम नाही केलं तर ईडी आणि इन्कम टॅक्स सारख्या संस्थांचा दुरुपयोग करत त्यांनी आमदारांना धमकी देण्यात आली असल्याचा आरोप नारायणसामी यांनी केला आहे.

दरम्यान, ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाही त्या राज्यातील सत्ताधारी सरकारमधील आमदारांना राजीनामे द्यायला सांगायचे आणि त्यानंतर सरकार बनवून त्याच आमदारांना निवडणुकीसाठी उभं करायचं ही भाजपची स्टाईल आहे. पैशाच्या जोरावर भाजप राज्यात सत्ता आणत असल्याचंही नारायणसामींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे, तुम्ही भाजपला मत द्या- स्मृती इराणी

“काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाज कधीही पुढे जाणार नाही याची काळजी घेतली”

ब्रेकिंग! दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या कोचला भीषण आग 

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More