“पंतप्रधान मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला आहे, असा गंभीर आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. ‘ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भाजपशी युती म्हणजे आत्महत्या आहे हे आम्हाला अगोदरच ठाऊक होतं, अशी खोचक टीका जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

काश्मीरचा प्रश्न सोडविण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. त्यांनी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चेचा मार्ग स्विकारला नाही, या शब्दात मोदींवर त्यांनी निशाना साधला आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याचा अजून विचार केला नाही, असंही मेहबूबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –

-काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर

-DySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया!

-नरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले 

-नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी

-सायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात