बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरात पूजा करताना जळत्या कापरामुळे लुंगीने पेट घेतला; मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मृत्यू

मुंबई | मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन बुधवारी सकाळी राहत्या घरी पूजा करत होते. त्यावेळी त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते 80 ते 90 टक्के भाजले होते. त्यांना तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. के. नलिनाक्षन 79 वर्षांचे होते. ते चर्चगेटमधील ‘ए’ मार्गावरील शार्लीविले इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. नलिनाक्षन यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बाबा कधीच पूजेची संधी चुकवत नसत. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते पूजा करत होते. यावेळी जळत्या कापरामुळे त्यांच्या लुंगीने पेट घेतला. माझी आई आणि मोलकरीण त्यावेळी घरी होत्या. मात्र बाबांची खोली आतून बंद असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही, अशी माहिती त्यांचे पुत्र श्रीजित यांनी दिली.

दार तोडून आत जाईपर्यंत बराच वेळ गेला होता. त्यांनी पट्टाही लावलेला असल्याने लुंगी सोडवणं शक्य होत नव्हतं. त्यांना आम्ही तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली, असं त्यांच्या मुलाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहिली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

‘…तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचं सावट; वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल

“कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More