बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

मुंबई | मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सचिन वाझे, अनिल देशमुख, खंडणी प्रकरण, परमबीर सिंग (Sachin Waze, Anil Deshmukh, Parambir Singh) यांच्यामुळे सध्या महाराष्ट्र पोलीस देशात गाजत आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो (Ex CP Of Mumbai Police) यांनी गृहखात्याबाबत आपली स्पष्ट मतं मांडली आहेत.

राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप होतात ते आरोप मुंबई पोलीस दलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याकडून होतात, यामुळं राज्य पोलीस दलाची मान खाली गेली आहे. राज्यात पोलीस आणि राजकारण्यांची अभद्र युती झाली असून ती तोडण्याची गरज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केली आहे. रिबेरो हे राज्य पोलीस दलातील एक मोठं नावं आहे.

सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे वर्दीतील गुंड अधिकारी आहेत, अशी घणाघाती टीका रिबेरो यांनी केली आहे. रिबेरो यांनी सध्याच्या गृहखात्याच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. रिबेरो यांनी यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील (R.R.Patil) यांची आवर्जून आठवण काढली आहे. आर आर पाटील यांनी चोख काम केलं होतं, असं रिबेरो म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्युलिओ रिबेरो यांनी माजी गृहमंत्र्यांवर गहखात्यां वाटोळं केल्याचा आरोप केला आहे. परिणामी रिबेरो यांच्या आरोपांनतर आता महाविकास आघाडी काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या 

“जागा किती तर 56 अन् बाता मात्र मोठ्या”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार?; ‘या’ तीन नावाची जोरदार चर्चा

“मंत्रीच पायघड्या घालतात, ‘ती’ भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला”

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

अवकाळी पावसाचा राडा, त्यातच हवामान खात्याकडून ‘या’ मोठ्या संकटाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More