बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला धक्का! काँग्रसचे माजी मंत्री राहिलेले ‘हे’ नेते होणार भाजपवासी

मुंबई | देशातील महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांमागे ज्योतिरादित्य शिंदे आणि जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशातच काँग्रेसच्या आणखी एक नेता काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हाती घेणार आहे.

काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कृपाशंकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समजत आहे.  उद्या दुपारी 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते.

दरम्यान, मुंबईत सुमारे 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे भाजपला याचा फायदरा होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला”

आश्चर्य! कोरोना लसीमुळे 9 वर्षानंतर 70 वर्षीय आजीची डोळ्यांची दृष्टी आली परत

पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जागतिक पातळीवरील नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More