‘भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जास्त संधी’; मुल्तानच्या सुल्तानचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | टी-ट्वेन्टी विश्वचषक सामन्याची सुरूवात झाली आहे. ज्या सामन्याची भारतीयांकडून आतुरततेने वाट पाहिली जाते. तो सामना भारत आणि पाकिस्तान सामना येत्या 24 ऑक्टोबरला होणार आहे. भारत पाकिस्तान सामन्यापुर्वीचं वातावरण चांगलचं तापलेलं पहायला मिळत आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलं आहे.

विरेंद्र सेहवागची नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली आहे. त्यावेळी सेहवागने सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तानविरूद्धचा एकही सामना गमावलेला नाही. या कारणामुळे भारतीय संघावर म्हणावे असे दडपण नसेल, असं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

सध्याची परिस्थिती आणि स्पर्धेची रूपरेषा पाहता पाकिस्तानला नेहमीच जिंकण्याच्या जास्त संधी असतात. 50 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानला चांगलं खेळता येत नाही. टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात एखादा खेळाडू जबरदस्त कामगिरी करून गेला तर संघाला जिंकण्याची संधी असते. यामुळे पाकिस्तानला जिंकण्याची संधी असेल, असं वक्तव्य विरेंद्र सेहवागने केलं आहे.

दरम्यान, जेव्हा- जेव्हा विश्वचषकात भारताविरूद्ध सामना असतो तेव्हा पाकिस्तानच्या मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू असते. पाकिस्तान यावेळी इतिहास बदलणार आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आतापर्यंत तरी असं काही पहायला मिळालं नाही, असंही विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

अबब! 13 फुटी सापाला उचलण्यासाठी लागली जेसीबीची गरज; व्हिडीओ तुफान व्हायरल

पाकिस्तानचा कोच मॅथ्यू हेडन म्हणतो, भारताचे ‘हे’ दोन खेळाडू डोकेदुखी ठरणार

तारीख पे तारीख! टीईटीची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली – नाना पटोले

 

50 overs50 षटकाIndiaIndian teamMarathi NewsPakistanPakistan Mediat20 world cupVirender Sehwagटी ट्वेन्टी विश्वचषकपाकिस्तानपाकिस्तान मीडियाभारतभारतीय संघमराठी बातम्याविरेंद्र सेहवाग