बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींचा भाजपवर बूमरॅंग; दिला ‘हा’ मोठा धक्का

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. याच काळात काही नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे माजी नेते सुवेंद्रू अधिकारी यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. आता या ममतांनी भाजपवर बूमरॅंग केलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशकरून भाजपला मोठा धक्का दिला आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्रीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

2014 साली त्यांना भाजपने तिकीट देण्यास नकार दिला होता. तर त्यांचे चिरंजीव जयंत सिन्हा सध्या भाजपमध्येच आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या 5 वर्षांच्या कार्यकाळातच त्यांनी सरकारवर सातत्याने टीका केली होती. 6 वर्षांनंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

दरम्यान, 1960 बाॅचचे आयएएस अधिकारी राहिलेले यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये गेल्याने निवडणुकीत आणखी एक चेहरा मिळाला आहे. सुवेंद्रू अधिकारी यांची जागा भरून काढायला यशवंत सिन्हा सक्षम असतील असं मानलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”

धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये’; सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ

डोकी फुटली तर रडत दिल्लीत जाऊ नका’;संजय राऊतांचा कानडींना इशारा

…अन् लग्नानंतर उलगडलं 25 वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य; वाचा संपूर्ण प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More