FACT CHECK Top News देश

मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांवर सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. २४ तास पूर्ण होत नाही तेच मोदी सरकारने त्यांना एक नवीन जबाबदारी दिली आहे. मुर्मू यांना देशाच्या CAG (Comptroller and Auditor General of India) पदी नियुक्त करण्यात आले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी याची सूचना जारी केली आहे. मुर्मू हे राजीव महर्षी यांची जागा घेणार आहेत. २०१७ साली राजीव महर्षी यांना CAG पदी नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा होता. ६० वर्ष वय असलेले मुर्मू हे १९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत.ते गुजरात कॅडर अधिकारी आहेत.

मुर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांनी बुधवारी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ९ महिने हा कार्यकाळ सांभाळला. मुर्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्यांचे प्रमुख सचिव होते.

राजीव महर्षी हे १९७८ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. ते राजस्थान कॅडरचे अधिकारी आहे. महर्षी यांनी गृह सचिव पदी काम सांभाळले आहे. २०१७ साली त्यांना CAG पदी नियुक्त केले होते. CAG ची नियुक्ती ही साधारणतः ६ वर्षांसाठी केली जाते. या पदावरील नियुक्त व्यक्तीचे वय जोपर्यंत ६५ वर्ष होत नाही, तोपर्यंत ते काम करू शकतात. राजीव महर्षी ८ ऑगस्ट रोजी ६५ वर्षांचे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनाची लाट ओसरण्याची शक्यता; ‘ही’ आकडेवारी दिलासा देणारी

मनमाड हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांची गळा चिरून हत्या; 4 वर्षांच्या चिमुरडीला….

सेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई; ‘या’ 6 जणांविरोधात FIR दाखल

“अयोध्या मुक्त झाली आता…; आखाडा परिषदेचं हिंदूंना आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या