बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले

पुणे | विधापरिषदेच्या निवडणूका होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाॅट रिचेबल लागायला लागले. 16 आमदारांना सोबत घेऊन ते सुरतला रवाना झाले. यानंतर त्यांच्या गटात अनेक आमदार सामील झाले. अगदी काल परवा शिवसेनेत असणारे नेतेही शिंदे गटात सामील झाले. यातीलच एक म्हणजे माजी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत आहेत. बंड केल्यानंतर शिवसेनेसोबत असणारे उदय सामंत शिंदेसगटात काही दिवसांनी सामील झाले. यासंबधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मी गुवाहाटीला गेलो तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्याशी एकदा ही बोललो नाही. कारण माझ्या मनात एक आदरयुक्त भीती आहे, असं ते पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. शिंदे-ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय आम्ही सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला आहे, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पुण्यातील माजी नगरसेवक मला भेटले, त्यांच्या वतीने पुढील आठवड्यात मुंबईत (Mumbai) अभिनंदन आणि सत्कार करणार आहेत. 18 जुलैला सायंकाळी हा कार्यक्रम पार पडेल. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी सुद्धा आज भेटले आहेत. पहिली शिवसेना आणि दुसरी शिवसेना, अशी विभागणी आम्ही केलेली नाही. आम्ही सगळे शिवसैनिक म्हणूनच भेटलो, असंही ते म्हणाले.

मंत्रिपद मिळावं म्हणून कोणीही बंड केलं नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आमच्यात नाराजी नाट्य पहायला मिळेल असं विरोधक सांगत आहेत. कोणाला मंत्रिपद द्यायचं याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस निर्णय घेतली. आम्ही त्यांचे अधिकार त्यांनाच दिले आहेत. फडणवीस यांच्याकडून शिंदेंचं खच्चीकरण केलं जात आहे असं भासवलं आणि बोललं जात आहे. पण याबाबत स्वतः दोघांनी वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे विरोधकांची ही खेळी आहे, असा खुलासा देखील उदय सामंत यांनी केला.

थोडक्यात बातम्या

‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न

“शिंदे यांच्याबद्दल आदरच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच”

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

सुशांतचं आयुष्य बरबाद केलं म्हणणाऱ्या सुशांतच्या बहिणीला रियाचं प्रत्युत्तर, म्हणाली…

बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले ‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More