नवी दिल्ली | आपली बाजू ऐकून घेतली नाही म्हणत सीबीआयकडून केली जाणारी आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दणका दिला आहे.
उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
आयुक्तांपासून ते गृहमंत्र्यांबाबत सर्वांवरच गंभीर आरोप आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा सीबीआय चौकशीचा निर्णय अयोग्य म्हणता येणार नाही. सीबीआय चौकशीचे आदेश आल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण यापूर्वी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले तेव्हा ते पदावरच होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अनिल देशमुखांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी
भाषण चालू असताना अजित पवारांना चिठ्ठी आली, ‘दादा मास्क काढा’; अजित पवार म्हणाले…
‘…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात देऊन टाका’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला
रिमोटवरुन झाली भांडणं अन् आईने रागाच्या भरात स्वतःच्याच चिमुकलीला…
‘या’ गावातील लोक कपडे घालत नाहीत , पर्यटकांना देखील कपडे न घालण्याचा नियम लागू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.