बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना CBI ने बजावला समन्स

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर हे सर्व प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द केलं.

सीबीआय सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत असून रविवारी अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सहाय्यकाचा जवाब नोंदवण्यात आला आहे. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे या निलंबित पोलिस अधिकाऱ्याने एनआयए कोठडीतुन पत्र लिहून देशमुख यांनी खंडणी वसूल करायला लावल्याचा आरोप केल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

सीबीआयने अनिल देशमुख यांना समन्स बजावला असून 14 एप्रिलला अनिल देशमुख यांना परमबीर सिंह यांच्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सर्व प्रकरणात अनिल देशमुख हे दोषी आहेत की नाही याकडे एकूणच सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं पण सर्वोच्च न्यायालयातूनही त्यांना माघारी फिरावं लागलं. कारण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीच योग्य असल्याचा निर्वाळा दिला. 14 तारखेला सीबीआय अनिल देशमुख यांची चौकशी करणार असून या चौकशीअंती 15 दिवसानंतर नेमकं काय स्पष्ट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, पाहा आकडे

दीदी तुम्हाला राग आला तर मला शिव्या घाला- नरेंद्र मोदी

मराठमोळी संगीतकार जोडी अडचणीत, ‘या’ कारणामुळे पोलिसात तक्रार दाखल

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर जोरदार पावसाचं सावट, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More