बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला ईडीचा समन्स आला तेव्हा…’; व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुखांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर ईडीची चौकशी चालू होती. यानंतर ते अचानक गायब झाले आणि आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यांमामध्ये फिरत होत्या. परंतु मला जेव्हा जेव्हा ईडीचं समन्स आला तेव्हा मी त्यांना कळवलं की, माझी याचिका उच्च न्यायालयात आहेत. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल लागला की मी ईडीच्या कार्यालयात येईल, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

ईडीने जेव्हा आमच्या घरावर छापे टाकले तेव्हा माझ्या कुटुंबासह मी ईडीला सहकार्य केले. ईडीने मला दोनदा समन्स पाठवले. त्या दोन्ही वेळा मी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन माझं जबाब नोंदवला आहे. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांवर ईडी टांगती तलवार आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या- 

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

“एवढं गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर

‘त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेल’; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More