बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख प्रकरणी सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी; वाचा नेमकं काय झालं?

मुंबई| राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसूलीचे खळबळजनक आरोप करण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित हे आरोप केले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यातच आता अनिल देशमुखांच्या प्रकरणी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची चौकशी करण्यात आली आहे.

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी (ED) कार्यालयात हजर झाले होते. ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 6 तास सीताराम कुंटे यांची चौकशी केली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांसंदर्भात सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे अनिल देशमुखांच्या काळात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. पैसे घेऊन अनेक अधिकाऱ्यांना पोस्टींग दिली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

त्याचं बदल्यांच्या संदर्भामध्ये राज्याच्या तत्कालीन गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा अहवाल त्यावेळेसचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना दिला होता. त्यानंतर सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) तो अहवाल यांनी सीताराम कुंटे यांना दिला होता. या अहवालावर राज्य सरकारकडून काहीचं कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, ईडीकडून सीताराम कुंटे यांना तीनवेळा चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स ईडीकडून बजावण्यात आले होते. परंतु, सीताराम कुंटे यांनी प्रशासकीय कामकाज आणि मंत्रीमंडळ बैठकीच कारण सांगितलं होतं. अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीला सीताराम कुंटे यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने अखेर मंगळवारी ईडीकडूव सीताराम कुंटे यांची 6 तास चौकशी करण्यात आली.

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “मी त्यांना सांगितलंय की, काँग्रेसशिवाय…”

…अन् अभिनेत्री समंथा म्हणाली, “मग मी सेक्स निवडेल”

राज्यात कडाक्याची थंडी! येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार

जमलं बघा! हर्षवर्धन पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून

आशिष शेलारांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; किशोरी पेडणेकरांनी लिहिलं थेट गृहमंत्र्यांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More