बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास सीबीआयकडून सुरु करण्यात आला होता. अशातच आता अनिल देशमुखांचे वकील अनिल डागा यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुखांना ईडीकडून पाच वेळा समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र पाचही वेळा अनिल देशमुख चौकशीसाठी गेले नसून त्यांनी आपल्या वकिलाकडून निवेदन पाठवलं होतं. यादरम्यान, या तपासात पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डागांवर लाऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना देखील सीबीआयने काल ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 20 मिनिट त्यांची चौकशी केली होती. या प्रकरणात चतुर्वेदी यांचं नाव अद्याप समोर आलेलं नव्हतं. अशातच काल गौरव यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी गौरव यांचे अपहरण केलं असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, गौरव चतुर्वेदी यांचे अचानक नाव समोर आल्याने सर्वच अचंबीत झाले आहेत. तसेच सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना देखील काल अटक करण्यात आली आहे. आता देशमुख यांचे हे प्रकरण काय वळण घेईल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या-

पावसाने मोडला 12 वर्षांचा रेकाॅर्ड! 24 तासात तब्बल ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

12 पैकी ‘या’ 4 नावांवर राज्यपालांना आक्षेप???; मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मराठवाड्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

रात्री घरात शिरला बिबट्या अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

‘रामाची नियत खराब होती’; भाजपच्या ‘या’ आमदाराने उधळली मुक्ताफळे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More