बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू जडेजा यांचं कोरोनानं निधन

मुंबई | कोरोनाने सध्या संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला असून वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांसह राजकारणी, अभिनेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, दिग्गज व्यक्तीही धोरणामुळे मृत्त पावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनाने निधन झालं आहे.

राजेंद्रसिंह जडेजा यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं जडेजा यांच्या निधनाची माहिती दिली. बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

राजेंद्रसिंह जडेजा हे उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी 50 फर्स्ट क्लास आणि 11 लिस्ट A मॅचमध्ये अनुक्रमे 134 आणि 14 विकेट्स घेतल्या. या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे 1536 आणि 104 रन देखील काढले आहेत. त्याचबरोबर जडेजा यांनी 53 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट A आणि 34 टी20 मॅचमध्ये रेफ्री म्हणून देखील काम केलं आहे. ते सौराष्ट्र क्रिकेट टीमचे कोच, मॅनेजर आणि निवड समितीचे सदस्य देखील होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शहा यांनीही जडेजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, राजेंद्रसिंह जडेजा यांचं निधन ही क्रिकेट विश्वाची मोठी हानी आहे. मी आजवर ज्या व्यक्तींना भेटलोय त्यापैकी ते एक जबरदस्त व्यक्ती होते. ते कोच, मॅनेजर आणि निवड समितीचे सदस्य असताना क्रिकेट खेळण्याचं भाग्य मला लाभलं, अशा शब्दात जयदेव शहा यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, दशक्रिया विधीचा पोस्टर पाहून महाराष्ट्र हळहळला

बाबो! पाकिस्तानमध्ये चक्क पंतप्रधान इम्रान खान यांच्याच अटकेची मागणी

मांसाहार करा म्हणणाऱ्या संजय गायकवाडांनी रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली!

सावधान! चक्रीवादळामुळे ‘या’ चार जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More